
पुणे : लेखिका, कवयित्री आणि गायिका योगिनी जोगळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कसदार कवितांतून कवयित्रीनी नव्या स्त्री जाणिवांचा जागर केला. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, वि. दा. पिंगळे यावेळी उपस्थित होते. या कविसंमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, मृणालिनी कानिटकर-जोशी, वैशाली पतंगे, आश्लेषा महाजन, निरुपमा महाजन, मीना शिंदे, प्रज्ञा महाजन, योगिनी जोशी, चिन्मयी चिटणीस, सविता इंगळे, आरती देवगावकर, रुपाली अवचरे, अस्मिता चांदणे, आरुषी दाते, बालिका बिटले, नूतन शेटे, अंजली ढमाळ, वैशाली माळी, वासंती वैद्य या कवयित्रींनी त्यांच्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या. प्रास्ताविक मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी केले तर जोस्ना चांदगुडे यांनी सूत्र संचालन केले.
