
पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी डॉ म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार डॉ अलका चिडगोपकर यांच्या ‘मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सम्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ मुकुंद दातार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.