डॉ. मीना प्रभू यांना ‘मसाप जीवनगौरव’ फ्रान्सिस वाघमारे यांना’डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ फ्रान्सिस वाघमारे (नाशिक) यांना जाहीर झाला असून ११,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, “मराठी साहित्यातील प्रवास वर्णनाचे दालन डॉ. मीना प्रभू यांनी आपल्या कसदार लेखनातून समृद्ध केले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद होत आहे. फ्रान्सिस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ गतिमान करत धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यकर्ता म्हणून योगदान दिले आहे.  त्यांच्या कार्याचा गौरव करताना परिषदेला समाधान वाटत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top