
पुणे : ‘उसवण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालेले लेखक देविदास सौदागर आणि ‘समशेर व भूतबंगला’ या कादंबरीसाठी बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवार २१ जून २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे असे परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी कळविले आहे.



