
पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंधेला ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभंग आणि निर्गुणी भजनाचा हा कार्यक्रम विदुषी मंजिरी आलेगावकर सादर करणार असून त्यांना अजित किंबहुने आणि अमोल मोरे साथ करणार आहेत. प्राची जोगळेकर, स्वराली आलेगावकर, कीर्ती कुमठेकर आणि डॉ मृणाल वर्णेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. डॉ वर्षा तोडमल निरुपण करणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ६वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.