पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ लेखिका योगिनी जोगळेकर यांच्या जयंतीनिमित्त कवयित्रींच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवयित्री संमेलनात अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, वैशाली मोहिते, चिन्मय चिटणीस, निरुपमा महाजन, वर्षा कुलकर्णी, अनुराधा काळे, प्राजक्ता वेदपाठक, नूतन शेटे वैजयंती आपटे, जयश्री श्रोत्रीय, प्रतिभा पवार, ऋचा कर्वे, सविता कुरुंदवाड, वासंती वैद्य या कवयित्री सहभागी झाल्या होत्या. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
