संमेलनाचे उद्घाटन :- भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग
संमेलनाचा समारोप :- ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी प्रमुख अतिथी
संमेलनातील परिसंवाद/चर्चा विषय :-
- जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ?
- मराठी कोशवाङ्मय आणि विस्ताराच्या दिशा
- आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती
- आजच्या मराठी साहित्यात भयकथा,रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?
- अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने
- बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात का दिसत नाही ?
- स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना
समकालीन पुस्तकांवर चर्चा :-
- अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर चर्चा
सहभाग : अमोल पालेकर, संध्या गोखले आणि वृंदा भार्गवे
- शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा
सहभाग : शाहू पाटोळे, भूषण कोरगावकर, राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे
मुलाखती :-
- साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत
संवादक : डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर
- लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांची मुलाखत
संवादक : लेखक किशोर बेडकीहाळ आणि पत्रकार प्रसन्न जोशी
ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक सन्मान
ज्येष्ठ लेखक सन्मान : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड
ज्येष्ठ प्रकाशक सन्मान : बाबुराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, सोलापूर
‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम
सहभाग : प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, कृष्णात खोत, अभिराम भडकमकर संवादक : राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर
बालवाचकांशी संवाद
सहभाग : साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ल. म. कडू, संगीता बर्वे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व गणेश घुले
कथाकथन
निमंत्रितांची दोन कविसंमेलने
सांस्कृतिक कार्यक्रम :-
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगत्गुरू संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संतसाहित्याला अभिवादन करणारा डॉ. भावार्थ देखणे आणि सहकाऱ्यांचा ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम
- सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग
- महाराष्ट्राची हास्यजत्रा
- महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस उतरलेले ‘फोक आख्यान’
संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये
Ø संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी
Ø पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग
Ø ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस घेता येणार लाभ
Ø शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
Ø संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान
Ø संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रण
Ø सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण
Ø साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी बालकुमार वाचककट्ट्यावर विद्यार्थ्यांचा संवाद
Ø कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन
Ø संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा
Ø मान्यवर लेखकांच्या मुलाखती
Ø चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद
Ø ९९ विद्यार्थी उद्घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’
हे साने गुरुजींचे गीत.
Ø ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य
Ø साहित्यिक कार्यक्रमासह मनोरंजनाच्या कार्यक्रमात तरुणाईचा विशेष सहभाग
