महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-राजगुरुनगर
आयोजित मा.संतोष गाढवे (कवी, लेखक, प्रकाशक अध्यक्ष,मसाप.खेड) यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा २०२६ काव्यलेखनाचे विषय पाऊसपाणी पिकपेरणी ऋतु हिरवा
प्रथम पारितोषिक
रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल/श्रीफळ
द्वितीय पारितोषिक
रोख रक्कम ,सन्मानचिन्ह,शाल/श्रीफळ
तृतीय पारितोषिक
रोख रक्कम, सन्मानचिन्ह,शाल/श्रीफळ
उत्तेजनार्थपारितोषिक रोख रक्कम, सन्मानचिन्ह,शाल/श्रीफळ नियम व अटी:
- वरीलपैकी कोणत्याही एका विषयावरील, कोणत्याही काव्य प्रकारातील आपली कविता आपल्या नावागावासह ३० मे २०२६ अखेर ९०४९३१८६५६ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी
- या स्पर्धेकरिता कोणतेही प्रवेशशुल्क नाही
- सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण जून २०२६मध्ये होणाऱ्या पावसाळी कविसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाईल
- या स्पर्धेचे परीक्षण नेहमीप्रमाणे पारदर्शक पद्धतीने केले जाईल
- बक्षिसपात्र कवींना निसर्गकवी पद्मश्री ना.धों.महानोर स्मृती काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल
सदर स्पर्धेचा निकाल २जुन २०२६ रोजी समाजमाध्यमांवर जाहीर केला जाईल
संयोजन कमिटी
मा.सदाशिव अमराळे (उपाध्यक्ष,मसाप खेड)
मा.मधुकर गिलबिले (कवी, लेखक)
मा.बाबाजी शिंदे (कवी)
मा.डि.के.वडगावकर(कवी)
मा.दत्ता सुकाळे(कवी)
मा.लखण जाधव(कवी)
मा.प्रल्हाद शिंदे (कवी)
मा.प्रा.सुभाष साळुंके (लेखक,व्याख्याते)

महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
‘काव्यप्रेमी साहित्य व साहित्य संस्था पुरस्कार’ जाहीर
📚📚📚📚📚📚📚📚
विविध साहित्य प्रकारातील काव्यप्रेमी सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२६
१) सारे काही तुझ्याचसाठी- डॉ.सविता शेट्टी, कोल्हापूर
स्व. यशवंत चिंधू नेरे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – सौ. जया नेरे, नंदुरबार
२) उद्याचा दहशतगर्द अंधार – कविता मोरवणकर, मुंबई
स्व. विष्णूपंत माळोकार स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – माळोकार भगिनी, अमरावती
३) काव्यार्चना- अर्चना मुरूगकर, पुणे
दिलीप गोविंद दमाणे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – सौ.मनाली लक्ष्मण माळी, नवी मुंबई
४) खान्देमळणी- अनंता सूर
स्व.भिमाई बाविस्कर स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – प्रमोद बाविस्कर, जळगाव
५) लव्ह इज लव्ह- आशा नेगी, पुणे
स्व. जयवंती राजाराम तावडे स्मृती सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
प्रायोजक – श्री.अशोक राजाराम तावडे, मुंबई
६) एकसोबीस हरी पत्ती, दौंड आणि मी- संगिता अरबुने, वसई
कै.सौ. मातोश्री रत्नाबाई घोडके स्मृती सर्वोत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार
प्रायोजक – आनंद घोडके, सोलापूर
७) चलबट- प्रा.अर्जून होटकर, सोलापूर
स्व. पुष्पावती धर्माधिकारी स्मृती आत्मचरित्र पुरस्कार
प्रायोजक – सौ.सविता धर्माधिकारी, लातूर
८) एक पक्षी- सतिश गुलाबसिंह मालवे, अमरावती
स्व.रूक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार
प्रायोजक – कालिदास चवडेकर, सोलापूर
९) ओठावरील गाणी- विकास भावे, नौपाडा
स्व.सौ. सुंदर बोंगाळे स्मृती सर्वोत्कृष्ट समिक्षा साहित्य पुरस्कार
प्रायोजक – प्रा.संतोष बोंगाळे, सातारा
१०) निवडक स्त्री आत्मकथने: सामाजिक सत्त्व आणि स्वत्व शोध- डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, परभणी
मातोश्री कै.शालिनी चिंचवडकर स्मृती संशोधन ग्रंथ पुरस्कार
प्रायोजक – अविनाश चिंचवडकर, नेदरलँड
११) झाडं लावणारा मुलगा- प्रियांका कर्णिक,पुणे
एड. कॉ. मदन फडणीस स्मृती सर्वोत्कृष्ट चरित्र/प्रेरणादायी साहित्य पुरस्कार
प्रायोजक – सौ.मृदुला राजे, जमशेदपूर (झारखंड)
१२) प्रकाश पेरण्यासाठी – डॉ.लता पाडेकर, पुणे
विभागून
सणोत्सव- विलास सिंदगीकर, लातूर
शंकर घोरसे सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
प्रायोजक – अक्षरक्रांती प्रतिष्ठान, नागपूर
——साहित्य संस्था पुरस्कार ——
संत गाडगे महाराज विचार मंच, ओतूर,ता.जुन्नर, जि.पुणे
माधवराव कचवे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्य संस्था पुरस्कार
प्रायोजक – ॲड डॉ. नीता कचवे, बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती
आणि
माधव पवार- सोलापूर
यांना मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल काव्यप्रेमी मंच®️चा
काव्यप्रेमी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा 👇
१० मे २०२६ रविवारी सकाळी १० वा. लोकमान्य टिळक सभागृह, श्री. हिराचंद नेमचंद वाचनालय, किल्ला बागेजवळ, सोलापूर येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
म.सा.प. दक्षिण सोलापूर शाखेतर्फे “हृदयस्थ” काव्यसंग्रहाचे हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रकाशन.
सोलापूर :
कवयित्री रेणुका महागांवकर यांनी लिहलेल्या हृदयस्थ या काव्यसंग्रहातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडीचा समावेश असल्याने यातील कविता हृदयात स्थिरावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अॅम्फी थिएटर मध्ये रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द गायिका सन्मिता धापटे- शिंदे होत्या.









