शाखा वृत्त - दक्षिण सोलापूर शाखा

दिनांक 14 जून रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर तर्फे "वंदे मातरम् चा लपलेला इतिहास" या विषयावर पत्रकार तथा युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्त दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर) मध्ये हे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नुकतेच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले. आपल्या देशाचा वरवरचा आणि तात्पुरता इतिहासच आजच्या तरूणांना माहित आहे. असे न होता तरूणांनी आपल्या देशाच्या महान इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे ,आनंदमठ कादंबरीचे वाचन केले पाहिजे असे सिध्दाराम पाटील यांनी सांगितले.प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे तसेच वक्ते यांचा परिचय कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी करून दिला. वक्ते सिध्दाराम पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार दक्षिण सोलापूर शाखेचे प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, श्रुती वडगबाळकर, नगरसेवक सात्विक बडवे, सिध्देश्‍वर बॅकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, शिवसेनेचे महेश धाराशिवकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक श्रोत्ये तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी विद्याथींनीची मोठी गर्दी होती. शेवटी शिल्पा जिरांकलगी यांनी संपूर्ण वंदे मातरम हे गीत गायन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Scroll to Top