जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

दुर्मिळ ग्रंथांच्या  डिजिटायझेशनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात : प्रा.मिलिंद जोशी

पुणे : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, ग्रंथसेवक मृणालिनी भट, वर्षा डाळिंबकर, शोभना कुलकर्णी, ज्योस्ना नांदगिरीकर यावेळी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, साहित्य परिषदेचे वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. कार्यकारी मंडळाने दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव यांच्या सहकार्याने ग्रंथालयाचे नूतनीकरण केले. तसेच कल्याणराव जाधव अभ्यासिका सुरु केली. चार वर्षांपूर्वी ग्रंथ दत्तक योजना राबवून साहित्य परिषदेने दोनशे दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. कार्यकारी मंडळातील सदस्यांनी तसेच साहित्य रसिकांनी ग्रंथ दत्तक घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने त्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य केले होते. आता दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत असून ते पुणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने केले जाणार आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top