महाराष्ट्र साहित्य परिषदेची ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिके जाहीर

अमोल पालेकरखलील मोमीनदत्तप्रसाद दाभोळकरमंगला सामंत मसापच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे मानकरी

२६ मे रोजी १२० व्या वर्धापनदिन समारंभात डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिके प्रदान केली जाणार

पुणे : अमोल पालेकर, खलील मोमीन, दत्तप्रसाद दाभोळकर, मंगला सामंत, अभिराम भडकमकर, मोनिका गजेंद्रगडकर, भानू काळे, दिलीप फलटणकर, श्रीराम कुंटे, मुग्धा गोडबोले, माधव जाधव, नितीन हांडे, सदानंद कदम, मेघना भुस्कुटे, भीमराव वाघचौरे, डॉ. सविता नायक-मोहिते, शैला मुकुंद, विवेक गाडगीळ, डॉ. लता अकलूजकर, विद्या डेंगळे, मोहन काळे, मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, संजीवनी खेर, कृष्णाजी कोकाटे, नीलकंठ कदम, डॉ. रेवा दुभाषी, डॉ. संजय कप्तान, डॉ. कुशल पाखले, डॉ. संजय तुंगार, सुधीर साबळे, मंदार गद्रे, विद्या पोळ-जगताप, संजय दुधाणे, महेंद्र कुरघोडे, विजया ब्राह्मणकर, श्रीधर दीक्षित या लेखकांच्या ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर झाली आहेत.

अजीम नवाज राही, प्रशांत असनारे, हेमकिरण पत्की, चं. प्र. देशपांडे, डॉ. अशोक चौसाळकर, शिवराज गोर्ले, डॉ. सुनीलकुमार लवटे, हेरंब कुलकर्णी,  श्री. द. महाजन,  रमणलाल शहा, डॉ. अरुणचंद्र पाठक, मधुवंती पेठे, व. बा. बोधे, अनघा केसकर, श्रीपाद ब्रह्मे, सु.ल. खुटवड,  महेश कराडकर, विनया देसाई, उमेश घेवरीकर, उषा मेहता हे विशेष ग्रंथकार पारितोषिकांचे मानकरी आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. ग्रंथ आणि विशेष ग्रंथकार पारितोषिके २६ मे रोजी सकाळी १०.३० वा. एस. एम. जोशी सभागृहात प्रसिद्ध लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहेत;  अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top