पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२४ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार विनय नारकर यांच्या ‘वस्त्रगाथा’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मंगळवार, २१ मे २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
