‘मसाप’ च्या विशेष पुरस्काराचे २७ फेब्रुवारी रोजी वितरण  

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांचे वितरण २७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. २०२४ सालातील ऐतिहासिक पुस्तकासाठी दिला जाणारा द. वा. पोतदार पुरस्कार विजय आपटे लिखित हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत‘ या पुस्तकाला, समीक्षेसाठी दिला जाणारा रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. मीनाक्षी पाटील लिखित उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता या पुस्तकाला, चिं. वि. जोशी पुरस्कार सारिका कुलकर्णी लिखित ‘बे दुणे पाच’ या लेखसंग्रहाला, विद्याधर पुंडलिक पुरस्कार मृणालिनी चितळे लिखित ‘निलू निरंजना’ या पुस्तकाला, सामाजिकसांस्कृतिक आणि वैचारिक लेखनासाठीचा शं.ना.जोशी पुरस्कार अर्चना जगदीश यांच्या देवराई, या पुस्तकाला,  ललित लेखनासाठीचा निर्मला मोने पुरस्कार डॉ. मेधा कुमठेकर लिखित मनातलं कागदावर या पुस्तकालानवोदित कवीच्या पहिल्या कविता संग्रहाला दिला जाणारा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार संकेत म्हात्रे लिखित तिथे भेटू या मित्रा या काव्यसंग्रहाला तर कवी यशवंत पुरस्कार राजेंद्र शहा लिखित एकांतस्वर या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. तसेच या वर्षीपासून सुरु झालेला कुंदा देशपांडे पुरस्कार वऱ्हाडी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकास दिला जाणार आहे हा पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांना देण्यात येणार आहेअशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ फेब्रुवारी २०२५ रोजीसायं. ६ वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रसिध्द लेखिका डॉ. विनया खडपेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार लेखकांना प्रदान करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top