पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक ४ जून २०२५ सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ही सभा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.