महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर तर्फे "लगान" या हिंदी चित्रपटाचे पटकथा लेखक श्री कुमार दवे यांचे व्याख्यान दिनांक 3 एप्रिल रोजी झाले.
कोणत्याही चित्रपटासाठी स्क्रीप्ट लिहीत असताना त्यातील बारकावे अधिक महत्वाचे असतात. असे प्रतिपादन लगान या हिंदी चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर (अॅम्फी थिएटर ) येथे शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात हे प्रमुख पाहुणे होते.
लेखनाचे अनेक प्रकार आहेत. कथा, कादंबरी, कविता, नाट्य कथा, यासह लेखनाचे प्रकार आहेत. नुसते हातात पेन घेतले म्हणजे लेखक होत नाही. मनातील विचार लोकांसमोर मांडताना त्यातील बारकावे किती प्रमाणात आपण कागदावर उतरवतो आणि ते समोरच्या रसिक श्रोत्यां पर्यत अधिक सक्षमपणे पोहोचवतो त्यातच लेखकाचे कौशल्य अवलंबून आहे. चित्रपट यशस्वी करण्यासाठी सेन्सीटीव्ह, सेनसीब्लीटी आणि मनोरंजन या तीन प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत. लगान या चित्रपटाची पटकथा लिहीत असताना एक साधा विचार त्यातून बारकावे शोधून पटकथा तयार झाली. असेही कुमार दवे यांनी सांगितले.
मला दिग्दर्शक व्हायचे होते परंतु मी लेखक झालो. अजीज मिर्झा यांच्या प्रेरणेमुळे मी पटकथा लिहण्यास सुरूवात केली. मी रायटर पेक्षा क्राफ्ट यामध्ये अधिक रसिक आहे. असेही दवे यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरकडून हा आगळ्या वेगळा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे नेहमी असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात यांनी आपल्या भाषणातून केली. मी चित्रकार आहे परंतु लगान हा चित्रपट मी अनेकवेळा पाहिला क्रिकेटच्या वेडापायी हा चित्रपट मी 10 ते 12 वेळा पाहिला असेही खरात यांनी सांगितले.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात जितेश कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय केला त्यानंतर चित्रकार सचिन खरात यांच्या हस्ते व्याख्याते कुमार दवे यांचा सत्कार करण्यात आला तर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सचिन खरात यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले तर आभार प्रकाश मोकाशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर, श्रीकांत येळेगांवकर, निवृत्त पोलीस उपअधिक्षक सुर्यकांत पाटील, प्राचार्य जी के देशमुख, सुधा इडलीचे सिध्देश्वर किणगी यांच्यासह मोठ्यासंख्येने रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी यांच्या वतीने जागतिक पुस्तक दिन पुस्तके वाचून संपन्न.



