Author name: admin

Uncategorized

महाराष्ट्राच्या साहित्य पंढरीला नवी झळाळी : वास्तूचे नूतनीकरण; साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबविले कल्पक उपक्रम

      एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे.       १९६१ साली परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी संमेलनाची योजना करून ती घेण्यास १९६५ पासून प्रारंभ केला. त्यापूर्वीची ४५ साहित्य संमेलने ‘महाराष्ट्र साहित्य संमेलने’ या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली. ही सर्व संमेलने गणनेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिली.     ‘साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे’ ही भूमिका समोर ठेवून २०१६ साली प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाने साहित्य परिषदेच्या कार्यशैलीत बदल केला. आज साहित्यिनिर्मितीचा केंद्रबिंदू सरकला आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील लेखक कसदार लेखन करीत आहेत. त्यांचेच साहित्य आज मराठी साहित्य विश्वाची समृद्धी वाढवीत आहे. शहरात आणि महानगरात सांस्कृतिक अजीर्ण व्हावे इतके साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात खरी सांस्कृतिक भूक आहे ती ग्रामीण भागात. हे लक्षात घेऊन साहित्य परिषदेने कार्यक्षेत्रातील छोट्या गावांतही आपल्या शाखांचा विस्तार केला आहे. तिथल्या प्रतिभेच्या नव कवडशांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिवर्षी ऐंशी टक्के नव लेखक कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी दिली. साहित्य परिषदेतर्फे विभागी साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. पूर्वी हे उपक्रम पुणे आणि परिसरातच होत असत. ते तिथे न घेता दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुका पातळीवर आणि छोट्या गावांतही घेतले जात आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात शाखा चालवताना प्रश्न असतो तो निधीचा. त्यावर मार्ग काढण्यासाठी साहित्य परिषदेने तेथील शाखांना त्याच ठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांबरोबर, महाविद्यालयांतील वाङ्मयमंडळांबरोबर साहित्य सहयोग करार करायला सांगितले. त्या करारानुसार महाविद्यालयांनी समारंभासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करायची आणि साहित्य परिषदेच्या शाखांनी साहित्यिक कार्यक्रम ठरवायचे, लेखकांना निमंत्रित करायची जबाबदारी पार पाडायची असे ठरलेले आहे. त्यामुळे शाखांना उपक्रम मिळाले, महाविद्यालयातील वाङ्मयमंडळे परिषदेशी जोडली गेली, तरुणाई परिषदेच्या संपर्कात आली. शाखांमधले साहित्य रसिक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात जाऊ लागले. साहित्यसंस्था साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला, हे या उपक्रमाचे खरे यश.  ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी शिवार साहित्य संमेलने –       साहित्यरसिकांना संमेलनांपर्यंत जाणे शक्य नसेल तर संमेलनाने साहित्यरसिकांपर्यंत गेले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने शिवार साहित्य संमेलनं सुरू केली. ग्रामीण भागांतील शिवारात होणाऱ्या या संमेलनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणतेही व्यासपीठ नाही, सत्काराचा डामडौल नाही, शिवारातल्या एखाद्या झाडाखाली सतरंजी टाकून बसायचे, त्याच शिवारातल्या फुलांनी आलेल्यांचे स्वागत करायचे. त्या परिसरातल्या लेखक-कवीला अध्यक्ष करायचे, त्यांचे भाषण, कविसंमेलन, कथाकथन असे सुटसुटीत कार्यक्रम ठेवायचे. स्थानिकांनाच सहभागी करून घ्यायचे. शेतात राबणाऱ्या मंडळींना रसिक म्हणून बोलवायचे, प्रत्येकाने आपापल्या घरून जेवणाचा डबा घेऊन यायचा. त्या शिवार मालकाची इच्छा आणि ऐपत असेल, तर त्याने स्वेच्छेने पिठलं- भाकरीचं जेवण द्यायचे अशी या संमेलनाची एकूण रीत आहे. या संमेलनात सहभागी होताना त्या शेतात राबणाऱ्या माउलीला उत्स्फूर्तपणे पन्नास-साठ ओळींचा उखाणा, ओव्या, कविता म्हणण्याची इच्छा होते. ती माउली सर्वांसमोर येऊन त्याचे सादरीकरण करते हा अनुभव या शिवार संमेलनांनी दिला. साहित्याचा पुणे- मुंबईत अडकलेला प्रवाह आज परिषदेच्या पुढाकाराने ग्रामीण भागातल्या पाटांमधून वाहतो आहे . वैविध्यपूर्ण उपक्रम     काही वर्षांपूर्वी साहित्य परिषदेत सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्याने आणि पारितोषिकांचे वितरण एवढेच कार्यक्रम होत असत. त्यांनाही कर्मकांडाचेच रूप प्राप्त झाले होते. साहित्य परिषदेने या कार्यक्रमांच्या स्वरूपात बदल केला. समाजाच्या विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्याबरोबर संवाद घडविणारा ‘मसाप गप्पा’ सारखा उपक्रम, कथेमागची कथा उलगडणारा ‘कथासुगंध’ कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळाशाळांत राबविलेला ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम, महानगरांबरोबरच ग्रामीण भागातील कवी आणि कवयित्रींना पुण्यात निमंत्रित करून त्यांच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडणारा ‘एक कवी एक कवयित्री’, सारखा उपक्रम राबवून परिषदेने साहित्यिकांसह साहित्यप्रेमींना परिषदेशी जोडले.    साहित्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांच्या सहयोगाने परिषदेने अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले. नवलेखक कवींना आणि मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक कार्यशाळा राज्यभर घेतल्या. टिळक रस्त्यावरील जागा उदारमनाने वास्तू उभारणीसाठी परिषदेला देणारे औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे तैलचित्र परिषदेच्या सभागृहात लावले.       डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प हाती घेतले. साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांचे नाव परिषदेच्या पायरीला देऊन साहित्यसेवकांचा प्रातिनिधिक सन्मान केला.     जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने रस्त्यावर ग्रंथविक्री करणारे ग्रंथसेवक, मुद्रितशोधक आणि मुखपृष्ठकार यांचा सन्मान करून परिषदेने नवा पायंडा पाडला. थोर सारस्वतांच्या जन्मशताब्दी आणि स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने पाटण येथे आयोजित केलेले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेले विभागी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. भाषा भगिनींमधील स्नेह वाढविला –     प्रसिद्ध लेखिका वैदेही, डॉ. प्रतिभा राय, सितांशु यशच्चंद्र, अशोक वाजपेयी, सूर्यबाला, डॉ. रामचंद्र गुहा अशा अन्य भाषांतील थोर सारस्वतांना परिषदेच्या वर्धापनदिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून भाषा भगिनींमधील स्नेहभाव दृढ व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोक चळवळ –     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेने लोक चळवळ उभारली, त्यासाठी लेखकांच्या बैठका, पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांमार्फत एक लाख पत्रं पाठविण्याचा उपक्रम, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि गाठी भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. महाराष्ट्रातील साहित्य संस्थेने भाषिक प्रश्नासाठी थेट राजधानीत जाऊन आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे.   भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी आंदोलन – मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता. या आंदोलनाला यश आले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे यासाठीच्या लेखक आणि विधिज्ञांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच झाल्या. परिषदेच्या संकेतस्थळावर या कायद्याचे प्रारूप लोकांसाठी ठेवण्यात आले व त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या. परिषदेच्या पुढाकारामुळे हा भाषा शिक्षणाचा कायदा सरकारने केला. अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी सन्मानाने देण्यासाठी घटनाबदल-      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात, अशी भावना मराठी जनांमध्ये आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया होती तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत होती. मतदारांची पात्रता ते साहित्यसंस्था प्रमुखांची भूमिका या साऱ्याविषयीच आक्षेप घेतले जात होते. निवडणुकांच्या गदारोळात वातावरण कलुषित व्हायचे. त्यामुळेच अनेक थोर

Uncategorized

मसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन

पुणे : साहित्य परिषदेचा वर्धापन दिन म्हटलं की परिषदेच्या टिळक रस्त्यावरील वास्तूला केली जाणारी विद्युत रोषणाई,,आकर्षक रांगोळ्या,इतर भाषेतील नामवंत साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवोदित आणि मान्यवर लेखकांची उपस्थिती, सनईच्या सुरात साहित्यरसिकांचे मोगऱ्याची फुले देऊन आणि अत्तर लावून केले जाणारे स्वागत असे चित्र असते यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिषदेने प्रसिद्ध हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या उपस्थितीत होणारा वर्धापन दिन कार्यक्रम रद्द केले परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मुखपट्टी लावून आणि भौतिक अंतर राखत मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते फक्त दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर उपस्थित होते प्रा. मिलिंद जोशी म्हणाले परिषदेला साहित्यभिमुख आणि लोकाभिमुख करताना परिषदेने अनेक दर्जेदार कार्यक्रम रसिकांना दिले त्याचबरोबर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला पाठपुरावा, दिल्लीत जाऊन उठविलेला आवाज, मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा व्हावा यासाठी घेतलेला पुढाकार, मुंबईत झालेल्या धरणे आंदोलनात नोंदविलेला लक्षणीय सहभाग ,संमेलन अध्यक्ष पद सन्मानाने दिले जावे याच्या घटना बदलासाठी घेतलेली आग्रही भूमिका,गेली पाच वर्षे साहित्य सेतूच्या सहकार्याने घेतलेल्या लेखन कार्यशाळा या गोष्टी परिषदेच्या कृतिशीलतेच्या निदर्शक आहेत. कोरोना संकटाचे सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असून साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही भविष्यात साहित्य संस्था, लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रितशोधक, छपाई प्रक्रियेतील सर्व घटक, ग्रंथ वितरक आणि ग्रंथ विक्रेते यांनी परस्परांशी सतत संवाद साधून सामूहिक प्रयत्नातून येणाऱ्या आव्हानांचा सामना केला पाहिजे मसाप त्यासाठी पुढाकार घेईल. गेल्या पाच वर्षांपासून प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या साहित्य सेतूच्या सहकार्याने परिषद तंत्रस्नेही झाली असून या पुढे गर्दी टाळण्यासाठी परिषदेचे कार्यक्रम रसिकांना यू ट्यूब आणि फेसबुक या माध्यमातून घरबसल्या पाहता येतील. भविष्यातील सर्व आव्हाने पेलण्यास परिषद सज्ज आहे सौजन्य – साहित्य सेतू

Uncategorized

अंक ‘निनाद’ (अमेरिकेतील वार्षिक अंक) – लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०

आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी काहीतरी दर्जेदार व वाचनीय साहित्य अंकाच्या स्वरुपात सादर करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आम्ही काही साहित्यप्रेमी एकत्र आलो.

Scroll to Top